IND vs BAN : रोहित शर्माने ख्रिस गेलच्या नावावर असलेला महारेकॉर्ड मोडला, काय केलं ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारत आणि बांग्लादेश यांच्यात सामना सुरु आहे. टीम इंडियाने या सामन्यात अपेक्षेप्रमाणे फलंदाजी केली आहे. विकेट पडल्या तरी स्कोअरबोर्डवर बऱ्यापैकी धावा लागल्या आहेत. रोहित शर्माने 11 चेंडूत 23 धावांची खेळी केली. मात्र यात त्याने एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.

| Updated on: Jun 22, 2024 | 9:10 PM
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचं गणित बांगलादेशविरुद्धच्या  सामन्याच्या निकालानंतर सुटणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर पुढचा मार्ग सुकर होणार आहे. नाणेफेकीचा कौल गमवला असला तरी भारताच्या मनासारखा निर्णय झाला. प्रथम फलंदाजी करण्याची संधी टीम इंडियाला मिळाली.

1 / 5
कर्णधार रोहित शर्माने 11 चेंडूंचा सामना करत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 23 धावा केल्या.मात्र शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना झेल बाद झाला. जाकेर अलीने त्याचा झेल पकडण्यात कोणतीच चूक केली नाही. पण तिथपर्यंत रोहितच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली होती.

2 / 5
 कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ख्रिस गेलच्या नावावर असलेला मोठा विक्रम मोडला आहे. रोहित शर्माने आपल्या खेळीत एक षटकार मारला आणि बांग्लादेशविरुद्ध षटकारांचं अर्धशतक पूर्ण केलं.

कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ख्रिस गेलच्या नावावर असलेला मोठा विक्रम मोडला आहे. रोहित शर्माने आपल्या खेळीत एक षटकार मारला आणि बांग्लादेशविरुद्ध षटकारांचं अर्धशतक पूर्ण केलं.

3 / 5
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा वेगवेगळ्या संघांविरुद्ध 50 षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. याआधी रोहित शर्मा ख्रिस गेलच्या बरोबरीत होता. ख्रिस गेलने पाच संघांविरुद्ध षटकारांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

4 / 5
रोहित शर्माने सहा संघांविरुद्ध, ख्रिस गेलने पाच संघांविरुद्ध, महेंद्रसिंग धोनीने तीन संघाविरुद्ध, शाहीद आफ्रिदीने तीन संघांविरुद्ध आणि ब्रँड मॅक्युलमने तीन संघांविरुद्ध षटकारांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.