
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना आयर्लंडशी झाला. अपेक्षेप्रमाणे भारताने हा सामना एकहाती जिंकला. या सामन्यात आयर्लंडने फक्त 97 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 2 गडी गमवून 12.2 षटकात पूर्ण केलं.

आयर्लंडला पराभूत करत टीम इंडियाने एका विक्रमाची नोंद केली आहे. विक्रम रचत पाकिस्तानला मागे टाकलं आहे. भारताने आयर्लंडला 8 गडी राखून पराभूत केलं. हा भारताचा 29 वा विजय आहे.

टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्यात पाकिस्तानला मागे टाकलं आहे. पाकिस्ताने टी20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 28 विजय मिळवले आहेत. तर श्रीलंका या यादीत टॉपला असून 31 विजय मिळवले आहेत.

टीम इंडियाचा पुढचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी आहे. 9 जूनला हा सामना याच मैदानात होणार आहे. या मैदानावर गोलंदाजांचा बोलबाला आहे. त्यामुळे हा सामना अतितटीचा होणार यात शंका नाही.

भारतीय टीम: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराटकोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराज.