T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट टीमने रचला इतिहास, आता केली अशी कामगिरी

| Updated on: Nov 30, 2023 | 6:49 PM

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार आहेत. युगांडाने रवांडाला 9 गडी राखून पराभूत केलं. या विजयासह क्रिकेट इतिहासात नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

1 / 6
आयसीसी पुरुष टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अफ्रिकन देशातून युगांडाने क्वॉलिफाय केलं आहे. अमेरिका-वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या टी20 वर्ल्डकपसाठी तिकीट पक्कं केलं आहे. टी20 वर्ल्डकप पुढच्या वर्षी जून महिन्यात खेळला जाणार आहे.

2 / 6
युगांडाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. रवांडाचा संपूर्ण संघ 18.5 षटकात 65 धावा करून बाद झाला. युगांडासमोर विजयासाटी 66 धावांचं आव्हान दिलं होतं.  हे आव्हान युगांडाने एक गडी गमवून 8.1 षटकात पूर्ण केलं.

3 / 6
युगांडाच्या विजयामुळे झिम्बाब्वेचा स्पर्धेतील पत्ता कट झाला आहे. युगांडाने झिम्बाब्वेवर पाच गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर नामिबीयानेही झिम्बाब्वेला पराभूत केलं होतं. त्यामुळे गुणांच्या रेसमध्ये झिम्बाब्वे मागे पडली आणि आव्हान संपुष्टात आलं.

4 / 6
युगांडा हा टी20 वर्ल्डकप 2024 साठी क्वालिफाय होणारा 20वा संघ आहे. दुसरीकडे झिम्बाब्वे सलग दुसऱ्या टी20 वर्ल्डकपमध्ये पात्र होण्यास अपयशी ठरला आहे.

5 / 6
युगांडापूर्वी वेस्टइंडीज, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूजीलँड, पाकिस्तान, दक्षिण अफ्रीका, श्रीलंका, अफगानिस्तान, बांग्लादेश, आयर्लंड, स्कॉटलँड, पापुआ न्यू गिनी, कनाडा, नेपाळ, ओमान आणि नामीबिया या संघांनी क्वालिफाय केलं आहे.

6 / 6
आगामी टी-20 विश्वचषक 3 जून ते 30 जून दरम्यान होणार आहे. 20 संघांची ही स्पर्धा एकूण बाद फेरीसह तीन टप्प्यात खेळवली जाईल. 20 संघांची चार गटात विभागणी होईल. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ सुपर-10 मध्ये प्रवेश करतील. यानंतर, आठ संघ 4-4 च्या 2 गटांमध्ये विभागले जातील. सुपर-10 टप्प्यात दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.