IND vs IRE : आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने गाठला आणखी एक मैलाचा दगड, आता केली अशी कामगिरी
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात कर्णधार रोहित शर्माने पदाला साजेशी कामगिरी केली. रोहित शर्माला एक जीवदान मिळालं आणि त्याचा त्याने फायदा करून घेतला. विचित्र खेळपट्टीवर टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता.
1 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध रंगला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजांनी साजेशी कामगिरी करत आयर्लंडला 96 धावांवर रोखलं. ही धावसंख्या भारताने 2 गडी गमवून पूर्ण केली.
2 / 6
कर्णधार रोहित शर्माने पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करून फॉर्म दाखवून दिला. विजयासाठी 97 धावांची गरज असताना एकट्या रोहित शर्माने 52 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
3 / 6
रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या एकूण 597 षटकार मारले आहेत. रोहितने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात आणखी 3 षटकार मारले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 600 षटकार पूर्ण केले.
4 / 6
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक मैलाचा दगड गाठला. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. आयर्लंडविरुद्ध 26 धावा करत त्याने या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहली आणि बाबर आझमनंतर ही कामगिरी करणारा तिसरा खेळाडू आहे.
5 / 6
आयर्लंडकडून दहावं षटक मार्क अडेर टाकत होता. या षटकातील शेवटचा चेंडू रोहित शर्माच्या खांद्याला जोरात लागला. त्यानंतर दुखापतीमुळे रोहित शर्मा मैदानातून बाहेर पडला. रोहित शर्माने 37 चेंडूत 52 धावा केल्या आणि रिटार्ड हर्ट झाला.
6 / 6
रोहित शर्माने टी20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत 40 सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण 988 धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध 12 धावा करण्यात यश मिळालं तर 1000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरेल.