Retirement: 3 महिन्यात टीम इंडियाच्या 5 खेळाडूंची निवृत्ती, दोघांचा कायमचा अलविदा

| Updated on: Aug 25, 2024 | 8:36 PM

Team India Cricket Retirement: टीम इंडियाच्या 5 पैकी 2 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कायमचा अलविदा केला. तर तिघांनी टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

1 / 6
टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शिखर धवन याने 24 ऑगस्ट 2024 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. शिखर धवन यासह गेल्या 3 महिन्यात क्रिकेटला अलविदा करणारा टीम इंडियाचा एकूण पाचवा फलंदाज ठरला. धवनआधी निवृत्ती जाहीर करणाऱ्या उर्वरित टीम इंडियाच्या 4 खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात. (pc- Bcci)

2 / 6
टीम इंडियाने काही दिवसांपूर्वी इतिहास रचला. रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीत 17 वर्षांनंतर टी 20i वर्ल्ड कप जिंकला.त्यानंतर टीम इंडियाच्या तिघांनी झटपट टी 20i क्रिकेटला रामराम ठोकला. (pc- Bcci)

3 / 6
रोहित शर्मा याने टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर आपण या सर्वात लहान प्रकारातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. रोहित शर्माने टीम इंडियासाठी 2 टी 20i वर्ल्ड कप जिंकणारा पहिला खेळाडू हा बहुमान मिळवला. रोहितने त्याच्या टी 20i कारकीर्दीत 5 शतकं आणि 32 अर्धशतकांसह 159 सामन्यांमध्ये 3 हजार 3 धावा केल्या. (pc- Bcci)

4 / 6
रोहितसह विराट कोहली यानेही टी 20i क्रिकेटला अलविदा करत असल्याचं जाहीर केलं. विराटने भारतासाठी टी20i क्रिकेटमध्ये 125 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 38 अर्धशतकांसह 4 हजार 188 धावा केल्या. (pc- Bcci)

5 / 6
रोहित-विराटनंतर ऑलराउंडर रवींद्र जडेजा यानेही काही दिवसांनंतर टी 20i क्रिकेटला अलविदा केला. जडेजाने 74  सामन्यांमध्ये 515 धावांसह 54 विकेट्सही घेतल्या. (pc- Ravindra Jadeja)

6 / 6
तर त्याआधी अनुभवी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याने 1 जून रोजी आपल्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीची 1 जून 2024 रोजी घोषणा केली. कार्तिकने 26 कसोटीत 1025, 94 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1752 आणि 60 टी20iमध्ये 686 अशा धावा केल्या. (pc- Bcci)