टीम इंडियाचा क्रिेकेटर मनोज तिवारी याने 5 दिवसांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. मनोजने 3 ऑगस्टला क्रिकेटला अलविदा केलं होतं.
मनोजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र Revesports नुसार, मनोज तिवारी निवृत्तीचा निर्णय मागे घेत बंगाल क्रिकेटसाठी खेळणार आहे.
मनोजने क्रिकेट कारकीर्दीत 35 शतकांसह 18 हजार 925 धावा केल्या आहेत.
मनोजने टीम इंडियाचं 12 वनडे आणि 3 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. मनोजने पुन्हा खेळण्याच्या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. बंगाल क्रिकेटसाठी ही दिलासादायक बाब आहे.
मनोज हा बंगाल क्रिकेट क्लबचा अनुभवी खेळाडू आहे. मनोजने आतापर्यंत अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केलंय.