
पृथ्वी शॉ ची एक्स गर्लफ्रेंड प्राची सिंहने लग्न केलय. अभिनेत्री प्राचीने गायक मधुर शर्मासोबत लग्न केलय. 9 मार्चला प्राचीच लग्न झालं. प्राचीने लग्नाचे सुंदर फोटो शेअर केलेत.

प्राचीच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर फॅन्सनी पृथ्वी शॉ ने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या मेसेजचा अर्थ काढायला सुरुवात केली आहे. प्राचीच लग्न झालं, त्याचदिवशी पृथ्वीने तो मेसेज टाकला होता.

काही लोक फायद्यासाठी तुमच्यावर प्रेम करतात. फायदा मिळणं बंद झालं की, त्याची प्रामाणिकता सुद्धा संपून जाते, असं पृथ्वी शॉ ने त्याच्या मेसेजमध्ये म्हटलं होतं,

पृथ्वी शॉ आणि प्राचीच्या प्रेम प्रकरणाची चर्चा झाली होती. 2020 मध्ये दोघे एका फोटोत एकत्र दिसले होते. आयपीएल दरम्यानचा हा फोटो होता. 2020 मध्ये प्राचीने पृथ्वीला बर्थ डे विश करतान आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

त्यानंतर पृथ्वी आणि प्राची दोघे वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या. सोशल मीडियावर दोघांनी परस्परांना अनफॉलो सुद्धा केलं होतं.