टीम इंडियासमोर नव्या वर्षात पाच आव्हानं, या अडचणींवर मात केली की झालंच समजा

| Updated on: Jan 01, 2024 | 9:28 PM

नववर्ष 2024 ला सुरुवात झाली आहे. क्रिकेटसाठी हे वर्ष महत्त्वाचं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा या वर्षात आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचं ठरणार आहे. असं असताना भारतासमोर पाच आव्हानं आहेत. आता टीम इंडिया ही आव्हानं कशी पार पडते, हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे.

1 / 6
नववर्षात टीम इंडियाला पहिला कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा आणि खेळाडूंचं बिझी शेड्युल आहे. आयपीएलनंतर लगेचच खेळाडू टी20 वर्ल्डकपसाठी सज्ज होतील. पण टीम इंडियाला एका दिव्यातून जावं लागणार आहे. तसेच काही गोष्टी रुळावर आणणं गरजेचं आहे.

2 / 6
टीम इंडियाला दक्षिण अफ्रिकेनंतर इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका 5-0 ने जिंकली तर टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा प्रवास सोपा होईल. कारण ही मालिका भारतात आहे. अन्यथा पुढचा प्रवास खुपच कठीण होईल.

3 / 6
आयपीएल स्पर्धा पार पडल्यानंतर सर्वांचा नजरा खिळतील त्या टी20 वर्ल्डकपकडे. भारताने 2007 साली टी20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर भारताची झोळी रिकामीच आहे. त्यामुळे आता भारताला आयसीसी चषकाचा दुष्काळ दूर करण्याची संधी आहे.

4 / 6
टी20 क्रिकेटमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा खेळणार का? हा देखील प्रश्न आहे. कारण या खेळाडूंचं वय 30 पेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षभरापासून टी20 क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळे टी20 खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

5 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत कोण कर्णधारपद भूषवणार हा देखील प्रश्न आहे. रोहित शर्मा अजूनही तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधार आहे. तर मागच्या दीड वर्षात टी20 खेळला नाही. हार्दिक पांड्याने कर्णधारपद भूषवलं. तर त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव कॅप्टन होता. त्यामुळे या तिघांपैकी कोण असा प्रश्न आहे.

6 / 6
वर्षाअखेरीस टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. या मालिकेतील निकाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत सांगणार आहे. भारत सोडला तर एकही संघ ऑस्ट्रेलियात विजय मिळवण्यात यशस्वी ठरलेला नाही.