अजित पवार यांनी 2 जुलै रोजी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता आणखी एका अजित नावाच्या दिग्गाजाला मोठी जबाबादारी मिळाली आहे. या दिग्गज अजितची मोठ्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटर अजित आगरकर यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
क्रिकेट सल्लागार समितीने अजित आगरकर यांची नियुक्ती केली आहे.
अजित आगरकर यांना निवड समिती अध्यक्ष म्हणून वार्षिक 1 कोटी रुपये इतकं वेतन मिळणार आहे.
अजित आगरकर यांनी टीम इंडियाचं 191 वनडे, 26 कसोटी आणि 4 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.
आगरकर यांनी टीम इंडियासाठी एकदिवसीय, कसोटी आणि टी 20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 58, 288 आणि 3 विकेट्स घेतल्या आहेत.