Mahendra Singh Dhoni | महेंद्रसिंह धोनी याचा 7 एकरवरील आलिशान फार्महाऊस, हरभजन सिंह याची वाकडी नजर
महेंद्रसिंह धोनी आणि हरभजन सिंह हे दोघे टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू. या दोघांमध्ये खटके उडाल्याची चर्चा रंगली. यावरुन हरभजन सिंह याने प्रतिक्रिया दिली आहे.
1 / 5
टीम इंडियाचा माजी आणि चेन्नईचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या 7 एकरवरील आलिशान फार्महाऊसबाबत सर्वांना माहिती आहे. हा फार्महाऊस जिम, स्विमिंग पूल, बाईक्ससाठी गॅरेज अशा एक न अनेक गोष्टींनी परिपूर्ण आहे. मात्र आता धोनीच्या फार्महाऊसवर टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंह याचा डोळा आहे.
2 / 5
एकमेकांच्या नात्याबाबत हरभजन याने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. भज्जीनुसार, त्याच्या आणि धोनीत सर्व काही ठीक आहे. बिजी असल्याने धोनीसोबत भेट होत नसल्याचं हरभजन याने म्हटलं. माझ्यात आणि धोनीत काहीही बिनसलेलं नाही, असंही भज्जी म्हणालाय. धोनीने माझी कोणतीही संपत्ती घेतली नसल्याचंही भज्जीने सांगितलं.
3 / 5
मात्र धोनीच्या काही संपत्तीवर माझा डोळा आहे, विशेष म्हणजे फार्महाऊसवर. क्रिकेटच्या मैदानात या दोघांमध्ये खटके उडाल्याच्या अनेकदा अफवा उडाल्या आहेत.
4 / 5
भज्जीने 2021 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर धोनीसोबत भज्जीचं खटकल्याची चर्चा रंगली होती. धोनी प्रमाणे इतर खेळाडूंनाही जर टीम मॅनेजमेंटकडून असाच पाठिंबा मिळाला असता, तर आणखी काही वर्ष खेळलो असतो, असं हरभजन निवृत्तीनंतर म्हणाला होता.
5 / 5
हरभजन धोनीच्या नेतृत्वात अनेक सामने खेळला आहे. भज्जीच्या त्या विधानानंतर दोघांमध्ये वाद असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र भज्जीने या सर्व चर्चा फेटाळून लावल्या.