वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेसाठी भारताचा आजपासून प्रवास सुरु, किती मालिका खेळणार? जाणून घ्या
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाला अपयश पचवावं लागलं आहे. पहिल्या स्पर्धेत न्यूझीलंडने, तर दुसऱ्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पराभवाचं पाणी पाजलं होतं. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दिशेने पुन्हा एकदा टीम इंडियाचा प्रवास सुरु झाला आहे.