टीम इंडियाच्या खेळाडूंना पैशाचा माज आहे. खेळाडूंना अति आत्मविश्वास आहे, असं टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव म्हणाले होते. देव यांच्या या विधानाला टीम इंडियाचा ऑलराउंडर रविंद्र जडेजा याने रोखठोक उत्तर दिलंय.
माजी खेळाडूंना मत मांडायचं पूर्णपणे अधिकार आहे. मात्र टीममध्ये कुणालाही अहंकार नाही, असं जडेजाने म्हटलं.
टीममधील प्रत्येक खेळाडू खूप मेहनत करतात. कोणताही खेळाडू काहीही गृहीत धरत नाही. चांगल्या खेळाडूंची टीम आहे. तसेच कुणीही आपला वैयक्तिक अजेंडा रेटत नाही, असंही जडेजा म्हणाला.
खेळाडूंना मदत हवी असेल तर ते आपल्या सनियर खेळाडूंना विचारत नाही. पैशांमुळे खेळाडूंमध्ये अहंकार वाढलाय, असं देव म्हणाले होते.
दरम्यान कपिल देव यांच्यासह वेंकटेश प्रसाद यांनीही टीम इंडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. टीम इंडिया चॅम्पियन होण्यापासून फार लांब झाली आहे. या टीममध्ये उत्साह दिसत नाहीत. ही टीम फक्त छोट्या विजयाचा जल्लोष करते, असं वेंकटेश प्रसाद म्हणाले होते.