दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाच्या खेळाडूची निवृत्तीची घोषणा, सोशल मीडियावरच केलं जाहीर

भारताच्या वेगवान गोलंदाजाने निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने ही माहिती दिली आहे. भारतासाठी वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये आपलं योगदान दिलं होतं. मात्र मागच्या पाच वर्षापासून त्याला संधी मिळाली नाही.

| Updated on: Nov 28, 2024 | 8:49 PM
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेदरम्यान भारताच्या एका खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल आहे. (फोटो- Robert Cianflone/Getty Images)

1 / 5
सिद्धार्थ कौलने भारतासाठी शेवटचा सामना 2019 मध्ये खेळला होता. तेव्हापासून सिद्धार्थ कौल टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली आहे. भारताने 2008 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. सिद्धार्थ कौल त्या संघाचा भाग होता. (फोटो-सिद्धार्थ कौल इंस्टाग्राम)

2 / 5
सिद्धार्थने टीम इंडियासाठी 3 वनडे आणि 3 टी20 सामने खेळला आहे. आयपीएलमध्येही त्याने नशिब आजमावलं आहे. सिद्धार्थने पहिला आंतरराष्ट्रीय टी20 सामना 2018 मध्ये आयर्लंडविरुद्ध खेळला होता. याच वर्षी इंग्लंडविरुद्ध वनडेत पदार्ण केलं होतं. टी20 क्रिकेटमध्ये 4 विकेट घेतल्या. तर वनडे एकही विकेट घेता आली नाही. (फोटो-सिद्धार्थ कौल इंस्टाग्राम)

3 / 5
सिद्धार्थ कौल आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेअरडेविल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी खेळला आहे. आयपीएलमध्ये 55 सामन्यात 58 विकेट घेतल्या. शेवटचा आयपीएल सामना 2022 मध्ये खेळला होता. (फोटो-सिद्धार्थ कौल इंस्टाग्राम)

4 / 5
सिद्धार्थ कौलने सोशल मीडियावर लिहिले की, 'मी लहान होतो आणि पंजाबच्या मैदानात क्रिकेट खेळायचो, तेव्हा माझे एक स्वप्न होते. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायचं. 2018 मध्ये, देवाच्या कृपेने, मला टी20 आंतरराष्ट्रीय संघात कॅप क्रमांक 75 आणि एकदिवसीय संघात 221 क्रमांकाची कॅप मिळाली. आता माझी भारतातील कारकीर्द संपवून निवृत्तीची घोषणा करण्याची वेळ आली आहे. माझ्या कारकिर्दीतील सर्व चढ-उतारांदरम्यान मला मिळालेले प्रेम आणि पाठिंबा याबद्दल मी कृतज्ञता शब्दात व्यक्त करू शकत नाही.' (फोटो-सिद्धार्थ कौल इंस्टाग्राम)

5 / 5
Follow us
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.