टीम इंडियाचा स्टार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली याने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. या इंस्टा स्टोरीमध्ये विराटच्या हातावर कार्टियर ग्रीन डायल घडी पाहायला मिळत आहे.
विराटच्या हातातल्या घडीची किंमत ही जवळपास 7 लाख 95 हजारांच्या घरात आहे. याआधी विराटकडे पाटेक फिलिप नॉटिलस घडी होती. त्याची किंमत 57 लाख रुपये इतकी होती.
विराटच्या वॉच कलेक्शनमध्ये ब्लॅक डायल daytona घडीही आहे. या घडीची किंमत 20 लाख रुपये आहे. विराटकडे Patek Philippe Aquanaut घडी आहे. या घडीची किंमत ही 30 ते 35 लाखाच्या घरात आहे.
विराटकडे रोलेक्स डेडेट 40 ही घडी आहे, याची किंमत 27 लाख रुपये इतकी आहे.
दरम्यान विराट सध्या विश्रांतीवर आहे. विराट आता विंडिज दौऱ्यात खेळताना दिसणार आहे.