टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी शून्यावर बाद झाला. विराट अनेक वर्षांनी तिसऱ्या स्थानी खेळायला आला. विराटला 9 बॉल खेळूनही खातं उघडता आलं नाही. (Photo Credit : Bcci)
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याबाबत हरभजन सिंह याला मागे टाकलं आहे. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणाऱ्या टॉप 5 टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात. (Photo Credit : Social Media)
टीम इंडियाचा उंचपुरा आणि अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने 199 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इशांत या 105 सामन्यांमधून 40 वेळा शून्यावर बाद झाला आहे. इशांत या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. (Photo Credit : Afp)
विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 38 वेळा एकही धाव न करता मैदानाबाहेर गेला आहे. (Photo Credit : Social Media)
हरभजन सिंह चौथ्या स्थानी आहे. हरभजनने 367 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. हरभजन 37 वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo Credit : PTI)
अनिल कुंबळे पाचव्या स्थानी आहे. अनिल कुंबळेने 403 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कुंबळे 35 वेळा शू्न्यावर बाद झाला आहे. (Photo Credit : AFP)
झहीर खान हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय आहे. झहीर एकूण 44 वेळा शून्यावर आऊट झाला आहे. (Photo Credit : Bcci X Account)