भारतात 12 वर्षानंतर यंदा 2023 मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे 5 अनुभवी खेळाडू क्रिकेटला रामराम करु शकतात.
शिखर धवन याचं नाव सर्वात आघाडीवर आहे. शिखरला वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार की नाही, याबाबत अजून काहीच निश्चित नाही. तसेच शिखर 37 वर्षांचा आहे. वय आणि न मिळणारी संधी या दोन्ही गोष्टींचा विचार करता शिखर निवृत्तीचा विचार करु शकतो.
स्विंगचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यालाही संघात जागा मिळाली नाही. टीम इंडियासाठी त्याने 121 सामन्यात 141 विकेट घेतल्या आहेत. मात्र आता तो संघातून बाहेर फेकला गेला आहे.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा 36 वर्षांचा आहे. वाढतं वय आणि फिटनेस पाहता सातत्याने वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळणं हे आव्हानात्मक आहे. त्यामुळे रोहित निवृत्तीचा विचार करु शकतो.
रविंद्र जडेजा 34 वर्षांचा आहे. जडेजा तिन्ही फॉर्मेटमध्ये बॅटिंग, फिल्डिंग आणि बॉलिंग या तिन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करतोय. मात्र वाढत्या वयासोबत अशीच सातत्यपूर्ण कामगिरी करणं हे आव्हानात्मक ठरु शकतं. त्यामुळे जडेजा आपल्या क्रिकेट कारकीर्दीबाबत मोठा निर्णय घेऊ शकतो.