Test Of India : टीम इंडियाचा किल्ला भारतात अभेद्यच, दिग्गज संघांनाही पाजलं पाणी
टीम इंडियाने नोव्हेंबर 2012 मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका गमावली होती. त्यानंतर टीम इंडिया भारतात सलगपणे टेस्ट सीरिज जिंकत आली आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंडचा प्रयत्नही अपयशी ठरला आहे.
1 / 6
टीम इंडियाला घरच्या मैदानावर पराभूत करणे केवळ अवघडच नाही तर अशक्य आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या सारख्या मोठ्या संघांनाही ते शक्य झालं नाही. (Photo- Twitter)
2 / 6
भारतीय संघ 2013 पासून घरच्या मैदानावर अजिंक्य आहे. 2013 पासून कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत भारताला हरवता आलेले नाही. तेव्हापासून भारताने घरच्या मैदानावर सलग 16 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. (Photo- Twitter)
3 / 6
2013 पासून भारताने मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये 8 संघांना पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक वेळा पराभूत केले. ऑस्ट्रेलियाला 3, वेस्ट इंजिजला 2, इंग्लंडला 2, बांगलादेशला 2, दक्षिण आफ्रिकेला 2, श्रीलंकेला 2. न्यूझीलँडला 2 आणि अफगाणिस्तानला 1 वेळा पराभूत केलं आहे. (Photo- Twitter)
4 / 6
11 वर्षात 16 कसोटी मालिकेत भारताने एकूण 36 सामने जिंकले आणि फक्त 3 सामने गमावले. (Photo- Twitter)
5 / 6
भारताने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्वीप केला होता. 2013 ते 2017 दरम्यान भारताने फक्त एकच सामना गमावला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. (Photo- Twitter)
6 / 6
2018 ते मार्च 2023 पर्यंत भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी एक सामना गमावला, पण भारताने मालिका जिंकली. (Photo- Twitter)