वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी विजेत्या कर्णधारांची असणार उपस्थिती, पण…
वनडे वर्ल्डकप 2023 जेतेपदासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.अंतिम सामना पाहण्यासाठी आयसीसीने सर्व विश्वविजेत्या कर्णधारांना निमंत्रण दिलं आहे.
1 / 11
अंतिम सामना संस्मरणीय करण्यासाठी आयसीसीने मागील सर्व विश्वविजेत्या कर्णधारांना एकदिवसीय विश्वचषक 2023 फायनलसाठी आमंत्रित केले आहे. हा सामना पाहण्यासाठी आयसीसीने 1975 ते 2019 या कालावधीतील चॅम्पियन संघांच्या कर्णधारांना निमंत्रण पाठवले आहे. या सर्व कर्णधारांना स्पेशल ब्लेझर दिलं जाणार आहे. स्पर्धा पाहताना हे ब्लेझर घालून सर्व कर्णधार बसणार आहेत.
2 / 11
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकातील पहिले तीन पर्व 50 नव्हे तर 60 षटकांचे होते. क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने विश्वचषक जिंकला. 1975 आणि 1979 साली त्यांच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजने सलग दोन वर्ल्डकप जिंकले.
3 / 11
कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने 1983 च्या विश्वचषकात इतिहास रचला. अंतिम सामना खूपच कमी धावसंख्या केल्या होत्या. भारताने प्रथम फलंदाजी करताना केवळ 183 धावा केल्या. पण अप्रतिम गोलंदाजी करत दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या 140 धावांत गुंडाळलं.
4 / 11
1987 वर्ल्डकपची फायनल ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झाली. ऑस्ट्रेलियाच्या 254 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडला केवळ 246 धावा करता आल्या. ऍलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया प्रथमच विश्वविजेता ठरला.
5 / 11
पाचवा विश्वचषक 1992 साली झाला. हा विश्वचषक पाकिस्तानने कर्णधार इम्रान खान याच्या नेतृत्वात जिंकला. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना खेळला गेला.पण पाकिस्तानला 1992 मध्ये विश्वचषक जिंकून देणारा इम्रान खान सध्या तुरुंगात आहे. 2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात येणं अशक्य आहे.
6 / 11
1996 साली श्रीलंकेने अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकला. पण अर्जुन रणतुंगा भारतात येणे कठीण आहे. रणतुंगाने अनेकवेळा भारतीय बोर्डावर गंभीर आरोप केले आहेत. श्रीलंका बोर्ड जय शाह चालवत असल्याची टीका केली होती.
7 / 11
1999 साली स्टिव्ह वॉच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला.
8 / 11
2003 आणि 2007 साली साली रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला.
9 / 11
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2011 साली 28 वर्षानंतर वर्ल्डकप जिंकला.
10 / 11
मायकल क्लार्कच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 2015 साली पाचव्यांदा वर्ल्डकप जिंकला.
11 / 11
वनडे वर्ल्डकप 2019 साली इंग्लंडने वर्ल्डक जिंकला. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला.