ODI WC 2023 : वनडे वर्ल्डकप इतिहासातील हे आहेत सर्वोत्तम पाच गोलंदाज, टॉप 5 मध्ये एकही भारतीय नाही
ODI World Cup 2023: वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं हे 13 वं पर्व आहे. आतापर्यंत झालेल्या 12 पर्वात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. वनडे वर्ल्डकप इतिहासात या गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे.
1 / 7
वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. यात एकूण दहा संघांचा सहभाग आहे. जेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान आणि इंग्लंड यांना पसंती दिली जात आहे.
2 / 7
माजी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅकग्रा वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. मॅकग्राने आपल्या कारकिर्दीत 39 वर्ल्डकप सामने खेळले असून एकूण 71 विकेट घेतल्या.
3 / 7
सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन दुसऱ्या स्थानावर आहे. मुरलीधरनने 39 एकदिवसीय सामन्यात 68 विकेट्स घेतल्या आहेत.
4 / 7
श्रीलंकेचा लसिथ मलिंगा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 28 सामने खेळणाऱ्या मलिंगाने 56 विकेट घेतल्या आहेत.
5 / 7
पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. अक्रमने 36 सामने खेळले असून 55 विकेट घेतल्या.
6 / 7
मिचेल स्टार्क हा टॉप 5 यादीतील एकमेव सक्रिय खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाकडून 18 सामने खेळणाऱ्या स्टार्कने 49 बळी घेतले आहेत.
7 / 7
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताकडून झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांचा समावेश आहे. झहीर सातव्या आणि श्रीनाथ आठव्या स्थानावर आहे. झहीरने 23 सामन्यात 44 गडी बाद केले आहेत. तर श्रीनाथने 33 डावात 44 गडी बाद केले आहेत.