Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचे हे चार खेळाडू वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळणार नाहीत! कारण…

IND vs WI: आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात वारंवार अपयश येत असल्याने निवड समिती काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारी आहे. दुसरीकडे महत्त्वाचे खेळाडू उपलब्ध नसल्याने टेन्शन वाढलं आहे.

| Updated on: Jun 16, 2023 | 11:09 PM
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर टीम इंडिया 1 महिन्याचा ब्रेक घेणार आहे. त्यानंतर भारतीय संघ पुढच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळणार आहे.

1 / 7
सलग दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरलेल्या टीम इंडियामध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्याचा आणि तरुणांना संधी देण्याचा बीसीसीआय विचार करत आहे.

2 / 7
पण यादरम्यान, टीम इंडियाचे टॉप 4 खेळाडू या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अनुपलब्ध असतील. त्यामुळे निवड समितीपुढे पेच निर्माण झाला आहे.

3 / 7
केएल राहुलला आयपीएलच्या 16व्या आवृत्तीत दुखापत झाली आणि त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता बरा झालेला राहुल पुनरागमनासाठी तयारी करत आहे. फिट होण्यासाठी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये सरावच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. केएल राहुल सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप संघात दिसू शकतो.

4 / 7
पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या सप्टेंबरपासून बाजूला झालेल्या बुमराहला आणखी दोन महिने विलंब होऊ शकतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल दरम्यान कॉमेंट्री करताना दिनेश कार्तिकने सांगितले की, बुमराह आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाकडून खेळणार आहे.

5 / 7
श्रेयस अय्यरलाही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. अय्यर यावेळीही आयपीएलमधून बाहेर होता. सध्या तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर असलेला अय्यर एकदिवसीय विश्वचषकासाठी संघात सामील होण्याची शक्यता आहे.

6 / 7
एका भीषण कार अपघातातून सावरणारा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सध्या एनसीएमध्ये आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, पंत वनडे विश्वचषकाद्वारे भारतीय संघात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. पण तोपर्यंत पंत तंदुरुस्त होणार का? हा प्रश्न आहे.

7 / 7
Follow us
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल.
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?.
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.