
वनडे वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत सर्वांचा नजरा विराट कोहली, रोहित शर्मा, शुबमन गिल, केएल राहुल, जसप्रीत बुमराह यांच्यावर असणार आहे.

विराट कोहली चौथ्यांदा वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होणार आहे. मागच्या तीन पर्वात त्याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. 2019 वर्ल्डकप स्पर्धेत त्याने संघाचं नेतृत्वही केलं आहे.

विराट कोहली वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या तीन पर्वात एकदाही शून्यावर बाद झालेला नाही. तसेत तीन स्पर्धांमध्ये 1 हजाराहून अधिक धावा केल्या आहे. अशी कामगिरी करणारा भारताचा एकमेव फलंदाज आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अशी कामगिरी करणारे फक्त तीनच फलंदाज आहेत. यात टॉपला श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या आघाडीवर आहे. दुसऱ्या नंबर विराट कोहली आणइ तिसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा विव रिचर्ड्स आहे.

सनथ जयसूर्या याने 1165 धावा केल्या आहेत. विराट कोहली याने 1030 धावा केल्या आहेत. तर विव रिचर्ड्सने 1013 धावा केल्या आहेत.

टीम इंडिया: रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शर्मी बुमराह , मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.