IPL 2024 : आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यापासून हे सात खेळाडू प्रत्येक पर्वात खेळले, जाणून घ्या कोण ते

| Updated on: Dec 21, 2023 | 6:57 PM

आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत आयपीएलचे 16 पर्व पार पडले आहेत. आता आयपीएल 2024 स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरु झाली असून मिनी लिलावही पार पडला आहे. पण या सर्वात एक बाब सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत, ती म्हणजे आयपीएल सर्व हंगाम खेळणारे खेळाडू कोण? चला तर जाणून घेऊयात त्यांच्याबाबत

1 / 8
आयपीएल 2024 अर्थात 17 व्या पर्वासाठी दुबईत नुकताच मिनी लिलाव पार पडला. दहा फ्रेंचायसींनी 72 खेळाडूंची या माध्यमातून खरेदी केली. दुसरीकडे, आयपीएलचे सर्व हंगाम खेळणाऱ्या खेळाडूंबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

2 / 8
महेंद्रसिंह धोनी 2008 पासून 2023 पर्यंत सर्व हंगामात खेळला आहे. इतकंच नाही तर त्याने कर्णधारपद भूषवलं आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्ससाठी एकूण 250 सामने खेळले आहेत. यात त्याने 5082 धावा केल्या आहेत.

3 / 8
आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यापासून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा भाग आहे. मागच्या सर्व पर्वात तो आरसीबीकडून खेळला असून पुढच्या हंगामातही याच संघाकडून खेळणार आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 237 सामने खेळले असून 7263 धावा केल्या आहेत.

4 / 8
रोहित शर्मा आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने 2008 पासून आयपीएल खेळण्यास सुरुवात केली. 2009 मध्ये त्याने डेक्कन चार्जर्ससाठी पहिल्यांदा जेतेपद जिंकून दिलं होतं. त्यानंतर मुंबई इंडियन्सला पाचवेळा जेतेपद मिळवून दिलं.

5 / 8
शिखर धवनही आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून खेळत आहे. आयपीएलच्या 217 सामन्यात त्याने 6617 धावा केल्या. शिखर धवन आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे. सध्या त्याच्याकडे पंजाबचं कर्णधारपद आहे.

6 / 8
बंगालचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा 2008 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. विराट, धोनी, रोहित यांच्यापेक्षा तो कमी सामने खेळला असला तरी त्याला प्रत्येक पर्वात खेळण्याची संधी मिळाली आहरे. वृद्धिमानने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, केकेआर, किंग्स इलेव्हन पंजाब, हैदराबाद आणि गुजरात टायटन्ससाठी 161 सामने खेळले आहेत.

7 / 8
दिनेश कार्तिक 2008 पासून आयपीएलमध्ये एकूण 6 संघांसाठी खेळला आहे. दिनेश कार्तिकने आयपीएल कारकिर्दीत 242 सामन्यात 4516 धावा केल्या.

8 / 8
मनीष पांडे 2008 पासून एकूण 7 संघांसाठी खेळला आहे. मनीष पांडेने दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स, लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स,हैदराबाद आणि पुणे वॉरियर्ससाठी 170 आयपीएल सामने खेळले. त्याने 3808 धावा केल्या आहेत.