ODI World Cup: पाच डबल सेंच्युरी ठोकलेले तीन भारतीय फलंदाज खेळणार वर्ल्डकप , उर्वरित 9 संघांमध्ये फक्त एकच खेळाडू
ODI Double Century in ICC World Cup: आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला असणार आहे. यासाठी भारतीय संघांची घोषणा झाली असून तीन फलंदाज द्विशतकवीर आहेत.
1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एकूण दहा संघांचा सहभाग असणार आहे. दहा संघापैकी पाच संघांची घोषणा झाली आहे. वर्ल्डकप जेतेपदासाठी भारतीय संघात दिग्गज खेळाडूंना स्थान मिळालं आहे. स्पर्धा भारतातच असल्याने जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानलं जात आहे.
2 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील खेळणार असलेल्या चार खेळाडूंच्या नावावर द्विशतक आहे. यापैकी तीन खेळाडू भारतीय आहेत. तसेच कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर 3 द्विशतकं आहेत. रोहित शर्मा याने 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 209, 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 264 आणि 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 208* धावा केल्या आहेत.
3 / 6
कर्णधार रोहित शर्मा याच्या व्यतिरिक्त शुबमन गिल आणि इशान किशन यांच्या नावावर द्विशतक आहे. शुबमन गिलने न्यूझीलंड विरुद्ध 2023 मध्ये द्विशतक ठोकलं आहे. तर इशान किशनने बांगलादेश विरुद्ध 2022 मध्ये द्विशतक ठोकलं आहे.
4 / 6
तीन भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त पाकिस्तानच्या फखर जमां याने द्विशतक ठोकलं आहे. 2018 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध 210* धावांची खेळी केली होती. वनडेत आतापर्यंत 8 खेळाडूंना 10 द्विशतकं ठोकली आहेत.
5 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत दोन खेळाडूंनी डबल सेंच्युरी ठोकली आहे. यात न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल यांचा समावेश आहे. गुप्टिलने वेस्ट इंडिजविरुद्ध, तर गेलने झिम्बाब्वे विरुद्ध डबल सेंच्युरी ठोकली आहे.
6 / 6
भारताकडून सर्वात पहिलं द्विशतक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने ठोकलं. 2010 साली त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही कामगिरी केली. त्यानंतर 2011 मध्ये वीरेंद्र सेहवाग याने वेस्ट इंडिज विरुद्ध द्विशतक ठोकलं.