गोल्फपटू टायगर वूड्ससाठी त्याची एक्स गर्लफ्रेंड एरिका हरमनने चांगलीच अडचण निर्माण केली आहे. एरिकाने न्यायालयाला विनंती केली आहे की, तिने आणि वूड्सने केलेला नॉन-डिक्लोजर करार रद्द करावा जेणेकरून ती उघडपणे बोलू शकेल. (Tiger Woods Instagram)
वुड्स आणि एरिका गेल्या सहा वर्षांपासून एकत्र होते. गेल्या वर्षीच दोघांचे ब्रेकअप झाले आहे. एरिका म्हणते की वुड्सने तिची फसवणूक केली आणि आता तिला वुड्सकडून नुकसान भरपाई हवी आहे. (Tiger Woods Instagram)
एरिका फ्लोरिडामध्ये वुड्सच्या घरात खूप दिवसांपासून राहत होती.तिला सुट्ट्यांसाठी विमानतळावर पाठवण्यात आले. जेव्हा एरिका विमानतळावर पोहोचली तेव्हा तिला समजले की, हे सर्व तिला घराबाहेर काढण्यासाठी केलं आहे. करारानुसार ती आणखी 5 वर्षे तेथे राहू शकते. (Tiger Woods Instagram)
एरिकाने आता वुड्सविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिला मानसिक त्रास दिल्याबद्दल दोन अब्ज रुपयांच्या नुकसानीची मागणी केली आहे. (Tiger Woods Instagram)
एरिकाने एनडीए रद्द करण्यासाठी शारीरिक शोषणाचा कारण पुढे केलं आहे. या आधारावर एनडीए रद्द केला जाऊ शकतो. मात्र शारीरिक शोषणाच्या आरोपांबाबत एरिकाने कोणतीही माहिती दिलेली नाही. (PGA Tour)