Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2025 : स्पर्धेला दोन दिवस शिल्लक असताना दोन सघांनी कर्णधार बदलले, कारण…

वुमन्स प्रीमियर लीगचं तिसरं पर्व 14 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. जेतेपदासाठी पाच संघांमध्ये चुरस असून अंतिम फेरीचा सामना 15 मार्चला होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना वडोदऱ्यातील कोटाम्बी, तर अंतिम फेरीचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होईल.

| Updated on: Feb 11, 2025 | 7:38 PM
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 14 फेब्रुवारीपासून वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होईल. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स या संघात होणार आहे. असं असताना दोन संघांनी कर्णधार बदलला आहे.

1 / 6
मुंबई इंडियन्सचं तिसऱ्या पर्वातही हरमनप्रीत कौर नेतृत्व करणार आहे. मागच्या दोन पर्वात तिने ही भूमिका यशस्वीरित्या पेलली आहे. इतकंच काय तर पहिल्या जेतेपदाचा मानही पटकावला आहे. त्यामुळे तिच्या खांद्यावर पुन्हा नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

2 / 6
युपी वॉरियर्सने यंदाच्या पर्वात भारतीय दीप्ती शर्माची निवड कर्णधार म्हणून केली आहे. अलिसा हिलीने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे युपी वॉरियर्सने यंदाच्या पर्वात दीप्ती शर्माच्या खांद्यावर धुरा सोपवली आहे.

3 / 6
दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा एकदा मेग लॅनिंगवर विश्वास टाकला आहे. तिच्या नेतृत्त्वात दिल्लीने दोन वेळा अंतिम फेरी गाठली होती. पण दोन्ही वेळेस पदरी निराशा पडली. पहिल्या पर्वात मुंबईने, दुसऱ्या पर्वात बंगळुरुने पराभूत केलं होतं.

4 / 6
गुजरात जायंट्सने यंदाच्या पर्वात नवा कर्णधार दिला आहे.  गुजरात जायंट्स फ्रँचायझीने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू अ‍ॅशले गार्डनरला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. यापूर्वी कर्णधाराची धुरा बेथ मुनीच्या खांद्यावर होती.

5 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पुन्हा एकदा स्मृती मंधानावर विश्वास टाकला आहे. स्मृतीने मागच्या पर्वात टीमला जेतेपद मिळवून दिलं होतं. त्यामुळे यंदाही त्याच कामगिरीची अपेक्षा आहे. दरम्यान, स्मृती मंधाना जबरदस्त फॉर्मात आहे.

6 / 6
Follow us
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.