ऑस्ट्रेलिया संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. काही खेळाडूंना संधी मिळते. तर काही खेळाडू प्रतिक्षेत असतात. ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाचं असंच काहीसं आहे. (PTI)
बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात उस्मान ख्वाजाने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील 14 वं शतक ठोकलं. भारताविरुद्ध त्याचं पहिलंच शतक आहे. भारतात दोन वेळा येऊनही त्याला संधी न मिळाल्याने हे शतक खास आहे. (PTI)
पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजा नाबाद 104 धावांवर खेळत आहे. "यात खूप भावना होत्या. या दौऱ्यापूर्वी मी दोनदा भारतात आलो होतो आणि सर्व 8 कसोटी सामन्यांमध्ये मी फक्त पाणी पाजले होते", असं ख्वाजाने सांगितलं.(PTI)
ख्वाजाचं आशियातील चौथं कसोटी शतक आहे. 2010-11 नंतर ऑस्ट्रेलियाकडून भारतात शतक ठोकणारा पहिला डावखुरी फलंदाज आहे. यापूर्वी मार्कस नॉर्थ बंगळुरू कसोटीत शतक ठोकलं होतं.(PTI)
जानेवारी 2022 मध्ये सिडनी कसोटीतून पुनरागमन करणाऱ्या ख्वाजाने 28 डावात 6 शतकं केली आहे. सध्याच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतही सर्वात जास्त धावा त्यानेच केल्या आहेत. सात डावात 257 धावांची खेळी केली आहे. (PTI)