IND vs ENG : कसोटी सामन्यात फक्त 9 धावा करताच विराट कोहलीला मिळणार मानाचं स्थान
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. या मालिकेतील पहिला सामना 25 जानेवारीपासून सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. तर रनमशिन विराट कोहलीला एक विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे.
1 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने भारत आणि इंग्लंड यांच्यात महत्त्वपूर्ण मालिका होत आहे. 25 जानेवारीला पहिला कसोटी सामना आहे. यासाठी दोन्ही संघ यासाठी सज्ज आहेत. भारतात मालिका होत असल्याने टीम इंडियाचं पारडं जड आहे.
2 / 6
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत अनेक विक्रम रचले तसेच मोडले जाणार आहे. रनमशिन विराट कोहलीला आणखी एक मैलाचा दगड गाठण्याची संधी आहे. कसोटीत नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या वेशीवर आहे.
3 / 6
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने 9 धावा करताच सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्यात पंगतीत बसणार आहे. भारताकडून इंग्लंडविरुद्ध दोन हजारांपेक्षा जास्त धावा करण्याचा मान सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्याकडे आहे.
4 / 6
विराट कोहलीने 9 धावा करताच कसोटीत इंग्लंडविरुद्ध 2000 धावा करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरेल. विराट कोहलीच्या इंग्लंड विरुद्ध 1991 धावा आहेत.
5 / 6
सचिन तेंडुलकरने 2535, सुनिल गावस्करने 2483 आणि विराट कोहलीने 1991 धावा केल्या आहे. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध 28 कसोटी सामने खेळले आहेत. 50 डावात 1991 धावा केल्या आहेत.
6 / 6
विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या कसोटीत 5 शतकं आणि 9 अर्धशतकं ठोकली आहेत. तर 6 वेळा शून्यावर बाद झाला आहे. 235 ही विराटची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.