Virat Kohli | विराट इंग्लंड विरुद्ध हा महारेकॉर्ड करण्यापासून इतक्या धावा दूर
India vs England | विराट कोहली याने वैयक्तिक कारणामुळे इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. मात्र विराटला कमबॅक करताच मोठा कारनामा करण्याची संधी आहे.
1 / 5
विराट कोहली सध्या तुफान फॉर्मात आहे. विराटचा हा फॉर्म वनडे वर्ल्ड कप 2023 पासून कायम आहे. विराटने दक्षिण आफ्रिके विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. अशात विराटकडून इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
2 / 5
विराटने वैयक्तिक कारणामुळे पहिल्या 2 सामन्यातून माघार घेतली आहे. मात्र त्यानंतर विराट खेळणार आहे. विराटला त्यानंतर उर्वरित मालिकेत 9 हजार कसोटी धावा पूर्ण करण्याची संधी आहे. विराटला त्यासाठी अवघ्या 152 धावांची आवश्यकता आहे.
3 / 5
विराट टीम इंडियासाठी कसोटी सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज आहे. विराटने 113 सामन्यांमध्ये 8 हजार 848 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 29 शतकं आणि 30 अर्धशतकं केली आहेत.
4 / 5
सर्वाधिक धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनच्या नावे 15 हजार 921 धावा आहेत. दुसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड आहे. द्रविडने 13 हजार 265 धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर सुनील गावसकर आहेत. लिटील मास्टर यांनी 10 हजार 122 धावा केल्या आहेत.
5 / 5
विराटने देशांतर्गत कसोटी सामन्यातही जबरदस्त कामगिरी केली आहे. विराटने 50 कसोटींमध्ये 4 हजार 144 धावा केल्या आहेत.