विराट कोहली. टीम इंडियाचा कर्णधार. विराट सक्रिय खेळाडूंपैकी सर्वाधिक शतक लगावणारा फलंदाज आहे. विराटच्या नावावर एकूण 71 शतकांची नोंद आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून विराट शतक लगावण्यात अपयशी ठरतोय. 15 महिन्यांपासून विराटची शतकाची पाटी कोरीच आहे. विराटने अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक हे 22नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. त्यामुळे शतक न लगावणं विराट आणि त्याच्या समर्थकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.