RAM Mandir : विराट कोहली, रोहित शर्मा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत; कारण…
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात क्रीडा विश्वातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. सचिन तेंडुलकरपासून रवींद्र जडेजा ते सायना नेहवालपर्यंत अनेक स्पोर्ट्स स्टार्संनी राम मंदिर सोहळ्यात सहभाग नोंदवला. मात्र या कार्यक्रमाला विराट कोहली आणि रोहित शर्मा गैरहजर होते. भारताचे माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद आणि अनिल कुंबळे रविवारी अयोध्येत दाखल झाले. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजही या सोहळ्याला उपस्थित होती.
Most Read Stories