विराट कोहलीच्या एका निर्णयामुळे आर अश्विनचा मोठा विक्रम हुकला, जर तसं केलं नसतं तर…

भारतीय क्रिकेट इतिहासातील आर अश्विन नावाच्या एका पर्वाचा शेवट झाला आहे. अनिल कुंबळे, हरभजननंतर भारतीय संघाला अश्विनसारखा तगडा फिरकीपटू मिळाला. त्याने आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. मात्र विराट कोहलीमुळे एक मोठा विक्रम हुकला.

| Updated on: Dec 19, 2024 | 3:19 PM
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यानंतर आर अश्विनने निवृत्ती जाहीर केली. तिसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विन प्लेइंग 11 चा भाग नव्हता. तसेच उर्वरित सामन्यात संधी मिळेल की नाही सांगता येत नव्हतं. असं असताना आर अश्विनचा निर्णय सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा होता. आर अश्विनने 106 कसोटी सामन्यात 200 डावात 537 विकेट घेतल्या आहेत.

1 / 6
आर अश्विनला मागच्या काही वर्षांपासून फक्त कसोटी संघातच स्थान मिळत होतं. मध्यंतरी मर्यादीत षटकांच्या सामन्यात त्याला संधी दिली गेली मात्र तितका प्रभाव टाकण्यात अपयशी ठरला होता, हे देखील तितकंच खरं आहे. असं असलं तरी आर अश्विनने त्याच्या कसोटी कारकि‍र्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली हे देखील विसरून चालणार नाही.

2 / 6
आर अश्विनने नोव्हेंबर 2011 मध्ये कसोटीत पदार्पण केलं होतं. त्या सामन्यात 9 विकेट घेत सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. अश्विनने कसोटीच्या पहिल्याच सामन्यात 156 धावा देत 5 गडी टीपले होते. त्यानंतर 2012 मध्ये पहिल्यांदा 10 पेक्षा जास्त विकेट एक विक्रम नोंदवला होता.

3 / 6
आर अश्विन क्रिकेट कारकि‍र्दीत अनेक कर्णधारांच्या नेतृत्वात खेळला. यात विराट कोहलीच्या कर्णधारपदात त्याने सर्वोत्तम कामगिरी केली. विराट कोहली कर्णधार असताना 94 डावात त्याने एकूण 293 विकेट घेतल्या. यासह एकाच कर्णधाराच्या नेतृत्वात कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला.

4 / 6
विराट कोहली काही काळ कर्णधारपदी राहिला असता तर कदाचित आर अश्विन या यादीत पहिल्या क्रमांकावर असता. पण विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं आणि हा विक्रमाला तिथेच पूर्णविराम लागला.

5 / 6
ग्रीम स्मिथच्या नेतृत्वात डेल स्टेनने 131 डावात 347 विकेट घेतल्या. तर आर अश्विनने विराटच्या नेतृत्वात 94 डावात 293 विकेट घेतल्या. ग्रीम स्मिथच्या नेतृत्वात मखाया एंटिनीने 130 डावात 280 विकेट घेतल्या आहेत. तर एलन बॉर्डरच्या नेतृत्वात क्रेग मॅकडरमोटने 98 डावात 231 विकेट घेण्याची किमया साधली आहे.

6 / 6
Follow us
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.