आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली रचणार इतिहास, फक्त एवढी कामगिरी केली की झालं…

| Updated on: Jun 05, 2024 | 5:33 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या प्रवासाला टीम इंडियाची आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून सुरुवात होईल. या सामन्यात आयर्लंडला कमी लेखणं महागात पडू शकतं. आयर्लंडची मागच्या काही सामन्यातील कामगिरी पाहता काहीही होऊ शकतं. असं असताना रनमशिन्स विराट कोहली एका विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. या सामन्यात त्याला नवा विक्रम रचण्याची संधी आहे.

1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील आठवा सामना भारत आणि आयर्लंड यांच्यात होत आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. मात्र आयर्लंडला दुबळं समजणं महागात पडू शकतं. त्यामुळे सर्वच स्तरावर टीम इंडियाला चांगली कामगिरी करावी लागेल. असं असताना विराट कोहलीली टी20 वर्ल्डकप इतिहासात एक इतिहास लिहिण्याची संधी आहे.

2 / 5
विराट कोहलीने आयर्लंडविरुद्ध 9 चौकार ठोकताच एक विक्रम नावावर होणार आहे. विराट कोहली टी20 वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरेल. विराट कोहलीचा फॉर्म पाहता त्याला हे गणित सहज जमेल असं क्रीडाप्रेमींना वाटत आहे.

3 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेच्या नावावर आहे. त्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 31 सामन्यात 111 चौकार मारून विश्वविक्रम नावावर केला आहे.

4 / 5
विराट कोहलीने 27 डावात आतापर्यंत 103 चौकार मारले आहे. आयर्लंडविरुद्ध 9 चौकार मारताच कमी सामन्यांमध्ये चौकार मारण्याचा विक्रम नावावर होईल. अजूनही विराट कोहलीकडे तीन सामने असून हा विक्रम करू शकतो.

5 / 5
न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी स्टेडियमवर हवा तशा धावा होत नाहीत. ही खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभारणं कठीण वाटत आहे. पण आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून विराट कोहली नवा इतिहास रचण्यासाठी उत्सुक आहे.