IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, नेमकं काय झालं वाचा

| Updated on: Jul 12, 2023 | 3:02 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गमावल्यानंतर टीम इंडियावर आणखी एक संकट घोंगावत आहे. आता एशेस मालिका आणि वेस्ट इंडिज मालिकेतील कामगिरी यावर सर्वकाही अवलंबून आहे.

1 / 7
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दृष्टीकोनातून ही सीरिज भारतासाठी महत्त्वाची आहे. तर आयसीसी क्रमवारीत एक नंबर वाचवण्यासाठी मालिका जिंकणं गरजेचं आहे.

2 / 7
टीम इंडिया 25 सामन्यात 117 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज 81 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताने ही मालिका 1-0 किंवा 2-0 ने गमावली तर पहिलं स्थान हातून जाईल.

3 / 7
टीम इंडियाचे गुण कमी होत 112 होतील आणि ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होतील. तर टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर पोहोचेल.

4 / 7
भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली तर मात्र पहिलं स्थान अबाधित राहील. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये 6 गुणांचं अंतर राहील आणि पहिल्या स्थानावर टीम इंडिया कायम राहिल.

5 / 7
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या एशेस मालिका खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-2 ने  जिंकली तर 119 गुण होतील. त्या उलट ही मालिका इंग्लंडने 3-2 ने जिंकली तर 117 गुण होतील.

6 / 7
भारताला आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान कायम ठेवायचं असेल तर वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकावीच लागणार आहे.

7 / 7
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशान किशन, श्रीकर भरत, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर.