IND vs NZ : पुण्यात एकाच शहरातील 2 गोलंदाजांचा धमाका, 10 विकेट्स घेत कारनामा
Washington Sundar R Ashwin Pune Test : आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने पुणे कसोटीत धमाका केला. या जोडीने 10 विकेट्स घेत न्यूझीलंडचा करेक्ट कार्यक्रम केला.
1 / 6
न्यूझीलंड टीम पुणे कसोटीतील पहिल्याच दिवशी ऑलआऊट झाली. न्यूझीलंडने पहिल्या डावात 259 धावा केल्या. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदर याने अप्रतिम बॉलिंग केली. सुंदरने अनेक वर्षांनंतर संघात कमबॅक केलं आणि टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केली. (Photo Credit : Bcci)
2 / 6
न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाच्या एकाच शहरातील 2 गोलंदाजांनी 10 विके्टस घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं फार क्वचितच होतं. आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर दोघे एकाच शहरातले आहेत. (Photo Credit : Bcci)
3 / 6
वॉशिंग्टन सुंदरचं भारतीय संघात जवळपास 3 वर्षांनंतर पुनरागमन झालं. सुंदरने पुण्यातील कसोटीतील पहिल्या डालवाच 23.1 ओव्हरमध्ये 59 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. (Photo Credit : Bcci)
4 / 6
न्यूझीलंडने ऑलआऊट 259 धावा केल्या, यामध्ये डेव्हॉन कॉनव्हे याने सर्वाधिक योगदान दिलं. तर कॉन्वहेने 76 धावा केल्या. तर रचीन रवींद्र याने 65 धावा केल्या. (Photo Credit : Bcci)
5 / 6
तसेच आर अश्विन याने न्यूझीलंडला पहिले 3 झटके दिले. त्यानंतर सुंदरने शेवटचे 7 विकेट्स घेत न्यूझीलंडला ऑलआऊट केलं. अश्विनने 24 ओव्हरमध्ये 64 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. (Photo Credit : Bcci)
6 / 6
तर टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 16 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा झिरोवर आऊट झाला. तर टीम इंडिया 243 धावांनी पिछाडीवर आहे. (Photo Credit : Social Media)