पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना जिंकत वेस्ट इंडिजने 2-0 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यातील विजयात डावखुऱ्या निकोलस पूरन यांची महत्त्वाची खेळी ठरली.
निकोलस पूरन याने 40 चेंडूंचा सामना करत 4 उत्तुंग षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. यासोबतच टीम इंडियाविरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये 50 हून अधिक धावा करण्याचा विक्रमही केला.
यापूर्वी हा विक्रम जोस बटलर, क्विंटन डी कॉक आणि कॉलिन मुनरो यांच्या नावावर होता. इंग्लंड संघाचा फलंदाज बटलरने भारताविरुद्ध चारवेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिका डी कॉकने भारताविरुद्ध चार वेळा 50हून अधिक धावा केल्या आहेत.
न्यूझीलंड संघाचा डावखुरा फलंदाज कॉलिन मुनरो यानेही भारतीय संघाविरुद्ध चार वेळा पन्नासहून अधिक धावा केल्या आहेत.
निकोलस पूरन याने टीम इंडियाविरुद्ध एकूण पाचवेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.
पूरनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने 18.5 षटकात दिलेलं लक्ष्य गाठलं. तसेच मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली.