Marathi News Photo gallery Sports photos West indies t20 series important for these indian players for odi world cup 2023 indian cricket team suryakumar yadav sanju samson ishan kishan tilak varma
WI vs IND | टीम इंडियाच्या ‘या’ 5 खेळाडूंसाठी T20 सीरीज ‘करो या मरो’, चमकले, तर वर्ल्ड कपच तिकीट पक्क
WI vs IND | टीम इंडियाची सध्या वेस्ट इंडिज विरुद्ध T20 सीरीज सुरु आहे. ही सीरीज टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे. टीम या सीरीजच्या निमित्ताने वनडे वर्ल्ड कपची तयारी करत आहे. 'या' पाच प्लेयरसाठी T20 सीरीज खूप महत्त्वाची आहे.
1 / 6
भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान वनडे वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धेला आता कमीवेळ शिल्लक राहिलाय. भारतीय टीम सध्या वेस्ट इंडिज विरुद्ध 5 T20 सामन्यांची सीरीज खेळत आहे. या टीममध्ये असे काही खेळाडू आहेत, जे वर्ल्ड कप खेळण्यासाठी दावेदार आहेत. पण त्यासाठी त्यांना स्वत:ला सिद्ध करावं लागेल.
2 / 6
टीम इंडियाच्या मधल्या फळीतील दोन फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर सध्या दुखापतीमधून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोघांच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवकडे पर्याय म्हणून पाहिलं जातय. त्याच्यासाठी वेस्ट इंडिज विरुद्ध चालू टी 20 सीरीज महत्वाची आहे.
3 / 6
संजू सॅमसनला टीममध्ये सातत्याने संधी मिळत नाही. त्याची निवड झाली नाही, तर फॅन्स सोशल मीडियावर रोष व्यक्त करतात. वेस्ट इंडिज विरुद्ध चालू दौऱ्यात त्याला बऱ्यापैकी संधी मिळालीय. पण संजू मिळालेल्या संधीचा फायदा उचलण्यात कमी पडलाय.
4 / 6
शुभमन गिलची बॅट चालू वेस्ट इंडिज दौऱ्यात फार तळपलेली नाही. चौथ्या टी 20 सामन्यात त्याने 77 धावा केल्या. वनडे सीरीजमध्ये त्याने एक अर्धशतक झळकावलं. शुभमन गिलसाठी चालू वेस्ट इंडिज दौरा महत्त्वाचा आहे. पाचव्या मॅचमध्येही शुभमनला अशीच बॅटिंग करावी लागेल.
5 / 6
इशान किशनने वनडेमध्ये प्रभावित केलं. पण टी 20 सीरीजमध्ये तो तितका यशस्वी ठरला नाही. म्हणून तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. इशान किशनकडे बॅकअप ओपनर म्हणून पाहिलं जातय. पण त्याच्या फॉर्मममध्ये सातत्य नाहीय. यशस्वी जैस्वालमुळे इशान किशनच्या अडचणी वाढतील.
6 / 6
तिलक वर्माने टी 20 सीरीजमध्ये डेब्यु केला. त्याने शानदार फलंदाजीने प्रभावित केलय. म्हणून माजी खेळाडू तिलक वर्माला वर्ल्ड कपच्या टीममध्ये पाहतायत. तिलक वर्मा मधल्या फळीत आक्रमक बॅटिंग करतो. त्याला पुढच्या काही सीरीजमध्ये संधी मिळाली, त्याचा असाच फॉर्म राहिला, तर तो वर्ल्ड कपच्या टीममध्ये दिसू शकतो.