पंजाब किंग्स फ्रेंचायसीमध्ये नेमकं काय सुरु आहे? प्रीति झिंटाने ठोठावला कोर्टाचा दरवाजा

| Updated on: Aug 16, 2024 | 11:06 PM

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील पंजाब किंग्स फ्रेंचायसीत वेगाने घडामोडी घडत आहेत. या फ्रेंचायसीमध्ये एकापाठोपाठ एक वाद होताना दिसत आहे. संघ मालकांमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. इतकंच काय तर हे प्रकरण आता कोर्टात गेलं आहे.

1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलावाची तयारी सुरु झाली आहे. यासाठी बीसीसीआयसोबत खलबतं सुरु झाली आहे. असं असताना पंजाब किंग्सच्या गोटातून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, संघ मालकांमधील वाद उफाळून आला आहे. इतकंच काय तर हे प्रकरण कोर्टाच्या दारात पोहोचलं आहे.

2 / 5
पंजाब किंगच्या चार मालकांपैकी एक असलेल्या प्रीति झिंटाने एक अन्य प्रवर्तकाविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेशाची मागणी केली आहे. केपीएच ड्रीम क्रिकेट प्रायव्हेट लिमिडेडच्या माध्यमातून पंजाब किंग्समध्ये 23 टक्के भागी असलेल्या प्रीति झिंटाने चंदीगड उच्च न्यायालयात अपील केली आहे.

3 / 5
पंजाब किंग्सचे सर्वाधिक शेअर हे मोहित बर्मन आणि प्रीति झिंटा यांच्याकडे आहेत. बर्मन यांच्याकडे 48 टक्के, तर प्रीति झिंटाकडे 23 टक्के शेअर आहेत. प्रीति झिंटाचा आरोप आहे की, बर्मन यांनी सहमालकांमध्ये झालेल्या कराराचं उल्लंघन करत 11.5 टक्के शेअर विकण्याचा प्रयत्न केला.

4 / 5
दुसरीकडे, बर्मन यांनी क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, त्यांनी आपले शेअर विकण्याचा कधीही विचार केलेला नाही. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणी 20 ऑगस्टला होणार आहे.

5 / 5
पंजाब किंग्स आयपीएलच्या मूळ आठ संघांपैकी एक आहे. आयपीएलच्या 17 पर्वात एकदाही जेतेपद मिळवता आलं नाही. पंजाब किंग्सला एकदाच अंतिम फेरी गाठता आली आहे. तेव्हाही कोलकाता नाईट रायडर्सने पराभूत केलं होतं. (सर्व फोटो- IPL/BCCI)