क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान संघ कधी भिडणार? जाणून घ्या

| Updated on: Jun 15, 2024 | 4:58 PM

भारत पाकिस्तान संघ आयसीसी स्पर्धेतच एकमेकांसमोर उभे ठाकतात. दोन्ही देशात गेल्या अनेक वर्षांपासून द्वीपक्षीय स्पर्धा होत नाही. आशिया कप आणि आयसीसी स्पर्धेतच हे दोन संघ भिडतात. त्यामुळे आता हे दोन संघ कधी भिडणार असा प्रश्न क्रीडारसिकांना पडला आहे. तर त्याचं उत्तर 2025 या वर्षात आहे. चला जाणून घेऊयात

1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीतच पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान लढत उपांत्य किंवा अंतिम फेरीत होण्याची सर्व शक्यता संपुष्टात आल्या आहेत. जर पाकिस्तानने सुपर 8 फेरी गाठली असती तर कदाचित हे संघ उपांत्य किंवा अंतिम फेरीत आमनेसामने आले असते.

2 / 5
भारत पाकिस्तान सामना आता कधी बघायला मिळणार? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. त्याचं उत्तर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 असं आहे. ही स्पर्धा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला होणार आहे. म्हणजेच सहा महिन्यांनी हे दोन संघ आमनेसामने येतील असं म्हणायला हरकत नाही.

3 / 5
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत.  रॉबिन राउंड पद्धतीने साखळी फेरीचे सामने होतील. त्यामुळे पहिल्या फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

4 / 5
चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. स्पर्धा पाकिस्तानात होत असल्याने टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

5 / 5
भारतीय संघ पाकिस्तानात स्पर्धा खेळण्यास स्पष्ट नकार दिला तर पाकिस्तानची कोंडी होईल. त्यामुले भारतीय संघाचे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित केले जाऊ शकतात. भारताचे सामने यूएई किंवा श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे.