वनडेमध्ये फ्लॉप, T20 मध्ये टॉप, असं कसं? ‘या’ चार कारणांमुळे सूर्यकुमारची अशी स्थिती
T20 मध्ये खेळताना सूर्यकुमार यादव एक वेगळा खेळाडू भासतो. तेच वनडेमध्ये खेळताना हाच तो सूर्यकुमार का? असा प्रश्न पडतो. मागच्यावर्षी T20 वर्ल्ड कपमधील सूर्याचा परफॉर्मन्स पाहून अनेकांनी तो वनडे क्रिकेट गाजवणार असा अंदाज बांधलेला. पण हे सर्व अंदाज मोडीत निघालेत.
1 / 6
वनडेमध्ये फ्लॉप ठरणारा सूर्यकुमार यादव T20 मध्ये कसा धावांचा पाऊस पडतो? हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. वनडेमध्ये सूर्यकुमार यादवच्या धावांना ब्रेक कसा लागतो? तिथे काय होतं? T20 मध्ये सूर्यकुमार यादव आज नंबर 1 फलंदाज आहे.
2 / 6
सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये फ्लॉप ठरला. त्याने वर्ल्ड कपमध्ये 20 पेक्षा कमी सरासरीने धावा केल्या. पण तेच काल T20 सामन्यात सूर्याने 42 चेंडूत 80 धावा चोपल्या.
3 / 6
T20 मध्ये सूर्यकुमारच्या यशाच रहस्य त्याचा बॅटिंग नंबर आहे. प्रत्येक फलंदाजासाठी असा एक नंबर असतो, जिथे तो खूप सहजतेने धावा जमवू शकतो. हा त्याला विश्वास असतो. सूर्याला सुद्धा हीच गोष्ट लागू पडते. सूर्या वनडेमध्ये सहाव्या नंबरवर येतो. तेच T20 मध्ये तो तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर येतो.
4 / 6
वनडे आणि T20 क्रिकेटमध्ये रणनितीमध्ये फरक असतो. वनडेमध्ये सूर्याचा रोल फिनिशरचा आहे. त्याने 40-50 चेंडू खेळावेत अशी अपेक्षा असते. तेच T20 मध्ये सूर्या पहिल्या चेंडूपासून आक्रमक होतो. परिणामी त्याच्या बॅटमधून धावा बरसतात.
5 / 6
T20 मध्ये गोलंदाजाची मानसिकता वेगळी असते. पहिल्या चेंडूपासून धावा वाचवण्याचा प्रयत्न असतो. लाइन आणि लेंग्थ वेगळी असते. वनडे क्रिकेट लाँग फॉर्मेट आहे. तिथे T20 पेक्षा गोलंदाज अजून बिनधास्त बॉलिंग करतात. त्यामुळे गोलंदाजाकडून चूका होण्याची शक्यता कमी असते.
6 / 6
T20 मध्ये सूर्याने भरपूर धावा केल्या आहेत. त्यामुळे या फॉर्मेटमध्ये तो मैदानवावर उतरतो, तेव्हा त्याचा आत्मविश्वास वेगळा असतो. तेच वनडेमध्ये तो फ्लॉप ठरलाय. त्यामुळे खेळताना ती गोष्ट त्याच्या डोक्यात असेल. परिणामी आत्मविश्वास कमी होतो.