World Cup 2023 : अफगाणिस्तान उपांत्य फेरीसाठी प्रमुख दावेदार! कसं असेल गणित ते जाणून घ्या
World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानने दोन मोठे उलटफेर केले आहेत. इंग्लंडनंतर पाकिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीसाठी आपण सुद्धा दावेदार असल्याचं दाखवून दिलं आहे. चला समजून घेऊयात नेमकं गणित काय ते...
1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानने जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान सारख्या दोन दिग्गज संघांना पराभूत केलं आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करण्याची अफगाणिस्तनची ही पहिलीच वेळ आहे.
2 / 6
अफगाणिस्तानने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अशीच कामगिरी सुरु ठेवली. तर नक्कीच उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. आता अफगाणिस्तानला साखळी फेरीत चार सामने खेळायचे आहेत.
3 / 6
अफगाणिस्तानने आतापर्यंत पाच सामने खेळले असून तीन सामन्यात पराभव, तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे. सध्या अफगाणिस्तानचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानला पुढील चार सामने श्रीलंका, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे.
4 / 6
उर्वरित चारही सामने अफगाणिस्तानने जिंकले तर एकूण 12 गुण होतील आणि उपांत्य फेरी गाठू शकतो. श्रीलंका आणि नेदरलँड विरुद्ध अफगाणिस्तान सहज विजय मिळवेल असं क्रीडाप्रेमी सांगत आहेत. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत उलटफेर करू शकतो.
5 / 6
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला अजून पाच सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलियाने 4 सामने जिंकल्यास आणि अफगाणिस्तान विरुद्ध पराभूत झाल्यास समसमान गुण होतील. म्हणजेच 12 गुण होतील. त्यामुळे धावगतीच्या आधारावर उपांत्य फेरीचा निर्णय घेतला जाईल.
6 / 6
पाकिस्तानचेही 4 गुण आहेत. त्यामुळे बाबर सेनाही 12 गुण मिळवू शकते. पण पाकिस्तानला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे. त्यामुळे सहज विजय मिळेल असं वाटत नाही.