Marathi News Photo gallery Sports photos World cup t20 ind vs pak Bumrah Pant two players are the true hero of Team Indias victory against pakistan in t20 world cup marathi news
IND vs PAK World Cup : पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करत टीम इंडियाच्या विजयाचे हे दोन खेळाडू खरे शिल्पकार
IND vs PAK T-20 World Cup : वर्ल्ड कपमधील ग्रुप स्टेजमधील भारताच्या वाघांनी पाकिस्तानची शिकार केली आहे. कमी धावांचा बचाव करण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला आहे. कोणलाही वाटलं नव्हतं की भारत हा सामना जिंकेल. सांघिक कामगिरीच्या जोरावर हा सामना भारताने ६ विकेटने जिंकला आहे. या विजयाचे दोन खेळाडू खरे शिल्पकार ठरले आहेत.
Follow us
भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाचा डाव 119 धावांच्या आतमध्ये गुंडाळला गेला होता. त्यामुळे कमी लक्ष्याचा पाकिस्तान संघ सहज करेल असं वाटतं होतं. मात्र टीम इंडियाच्या शिलेदारांनी हा विजय पाकिस्तानच्या हातून ओढुन घेतला.
भारताचे मुख्य फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे अपयशी ठरले. मात्र मैदानावर जीवघेण्या अपघातामधून परतलेल्या ऋषभ पंत याने 42 धावांची जिगरबाज खेळी केली. विकेट पडत असताना एक बाजू त्याने लावून धरली होती. रोहित 13, पंत 42 आणि पटेल 20 या खेळाडूंना सोडलं तर एकाही खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
भारतीय संघ बॉलिंगला उतरला पण सुरुवातीला काही विकेट मिळाली नाही. मात्र बाबर आझम याची विकेट घेत बुमराहने भारताच्या आशा जिवंत ठेवल्या.त्यानंतर भारताच्या इतर गोलंदाजांनी दबाव निर्माण करत पाकिस्तानच्या हातून सामना ओढण्यासाठी फिल्डिंग लावली. शेवटच्या ओव्हरमध्ये तीन ओव्हर बाकी असताना बुमराहने 19 व्या ओव्हरमध्ये इफ्तिखार अहमद याला आऊट करत भारताला सामन्यात कमबॅक करून दिली. बुमराहने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये अवघ्या 14 धावा देत 3 विकेट घेतल्या.
दरम्यान, भारताने आपला टी-२० क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव केला. महत्त्वाचं म्हणजे वर्ल्ड कप सामन्यात पाकिस्तानसारख्या संघाविरूद्ध अशी कामगिरी म्हणजे हा एक कायम आठवणीत राहणारा विजय असणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकटेकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग