WTC 2023 Final : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर वेगवान गोलंदाजांचा बोलबाला, पाहा भारत आणि ऑस्ट्रेलियाची काय आहे स्थिती

| Updated on: Jun 02, 2023 | 1:49 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. भारताने अंतिम फेरीत दुसऱ्यांदा, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा धडक मारली आहे. त्यामुळे जेतेपदासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत.

1 / 6
लंडनचे ओव्हल मैदान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या यजमानपदासाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे या मैदानावर टीम इंडियाचा किंवा ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड तसा पाहिला तर चांगला नाही. या मैदानाने फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाजांना अधिक मदत केली आहे.

2 / 6
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात चांगले वेगवान गोलंदाज आहेत. दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांचा अनुभव पाहता हा लढा वाटतो तितका सोपा नसेल.

3 / 6
या मैदानावरील दोन्ही संघांचे गोलंदाजी रेकॉर्ड पाहिले तर भारताच्या गोलंदाजीने येथे वर्चस्व आहे. ओव्हलवर भारतीय गोलंदाजांनी एकूण 27 बळी घेतले आहेत, तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी 20 बळी घेतले आहेत.

4 / 6
दोन्ही संघांच्या सध्याच्या वेगवान गोलंदाजांबाबत बोलायचं झालं तर भारताच्या वेगवान गोलंदाजांनी 12 तर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी 10 बळी घेतले आहेत.

5 / 6
सध्या टीम इंडियात असलेले उमेश यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे या मैदानावर यापूर्वी खेळले आहेत. उमेश यादवने टीम इंडियासाठी सर्वाधिक 6 विकेट घेतल्या आहेत. त्यांच्याशिवाय शार्दुल ठाकूरने 3, मोहम्मद शमीने 2 आणि मोहम्मद सिराजने 1 बळी घेतला आहे.

6 / 6
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या आहेत. त्याच्याशिवाय मिचेल स्टार्कने 3 आणि जोश हेजलवुडने 2 विकेट्स घेतल्या आहेत.