WTC 2023 : टीम इंडियाच्या या खेळाडूंनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये झळकावलीत सर्वाधिक शतकं, वाचा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वातही भारताने अंतिम स्पर्धेत धडक मारली आहे. यावेळी प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलिया असून सामना 7 जूनपासून 11 जूनपर्यंत असणार आहे.
1 / 7
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या पर्वात न्यूझीलंडकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. मात्र पुन्हा एकदा जेतेपदावर नाव कोरण्याची भारताला संधी आहे. यावेळी ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचं आव्हान आहे.
2 / 7
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन पर्वात काही भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. देश विदेशात शतकं झळकावत अंतिम फेरीत स्थान मिळवून दिलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे खेळाडू कोण आहेत जाणून घेऊयात
3 / 7
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने दोन्ही पर्वात जबरदस्त कामगिरी केली आहे. 2019-2021 च्या पहिल्या पर्वात त्याने 12 कसोटी सामन्यात चार शतकांसह 1094 धावा केल्या आहेत. पण 2021-23 पर्वात हवी तशी कामगिरी झाली नाही. रोहितने फक्त दोन शतकांसह 700 धावा केल्या.
4 / 7
मयंक अग्रवाल पहिल्या पर्वात जबरदस्त खेळला. 12 कसोटीमध्ये तीन शतकांसह 857 धावा केल्या. पण दुसऱ्या पर्वात फॉर्म गमवल्याने सात सामन्यात केवळ एका शतकासह 436 धावा करू शकला.
5 / 7
भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेनं पहिल्या पर्वात तीन शतकांसह 1159 धावा केल्या. मात्र फॉर्म गमावल्याने रहाणे दुसऱ्या पर्वात खेळला नाही.
6 / 7
विराट कोहलीने पहिल्या पर्वात दोन शतकांसह 934 धावा केल्या. मात्र दुसऱ्या पर्वात खराब फॉर्ममुळे टीकेचा धनी ठरला. कोहलीने बॉर्डर गावस्कर चषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकमेक शतक झळकावले आहे.
7 / 7
ऋषभ पंत अपघात झाल्याने सध्या संघात नाही. पहिल्या पर्वात 12 कसोटीमध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांसह 707 धावा केल्या. दुसऱ्या पर्वात त्याने दोन शतकं आणि पाच अर्धशतकांसह 868 धावा केल्या.