टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात 2 वेळा कसोटी मालिकेत पराभूत केलंय. टीम इंडियाने 2018-19 आणि 2020-21अशा एकूण 2 वेळा ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकलीय. या मालिका विजयात ऋषभ पंत याने निर्णायक भूमिका बजावली. पंतने तेव्हा जे केलं त्यामुळे आजही ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक जस्टीन लँगर हैराण आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 2020-21 मध्ये पराभूत केलं. तेव्हा लँगर ऑस्ट्रेलियाचा कोच होता. तर लँगर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023 फायनलमध्ये कॉमेंट्री करतोय. लँगरला कॉमेंट्री करताना पंतची 2021 मध्ये गेमचेंजिग खेळी आठवली.
जेव्हा पंतची ती खेळी आठवतो तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू येतात, असं लँगरने म्हटलं. पंतने तेव्हा 2021 मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती.
पंतने सिडनीत तिसऱ्या टेस्टमधील दुसऱ्या इनिंगमध्ये 97 धावा केल्या. पंतच्या या खेळीमुळे सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचं जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.
तर चौथ्या टेस्टमध्ये पंतने नाबाद 89 धावा करत टीम इंडियाला जिंकवलं होतं. टीम इंडियाने या विजयासह 2-1 च्या फरकाने मालिका जिंकली होती.