इंडिया लेजेंड्सने अंतिम सामन्यात श्रीलंका लेंजेड्सवर 14 धावांनी विजय मिळवला. यासह इंडिया लेजेंड्सने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी 20 स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
या अंतिम आणि महत्वाच्या सामन्यात इरफान आणि युसूफ पठाण या बंधूंनी निर्णायक भूमिका बजावली. इंडिया लेजेंड्सच्या विजयात यांनी मोलाटा वाटा उचलला.
इरफान पठाणने बॅटिंग करताना 3 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 8 धावा केल्या. तसेच निर्णायक क्षणी भारताला 2 विकेट्स मिळवून दिले. इरफानने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देत या 2 विकेट्स मिळवल्या.
तसेच युसूफने बॅटिंग आणि बोलिगंने यशस्वीरित्या दुहेरी भूमिका बजावली. युसूफने पहिले बॅटिंग करताना 36 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 62 धावांची खेळी केली. तसेच बोलिंग करताना 4 ओव्हरमध्ये 26 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.
युसूफला त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.