झिंबाब्वेने आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर सामन्यात वेस्टइंडिजवर 35 धावांनी विजय मिळवत सुपर 6 मध्ये एन्ट्री केली आहे.
ऑलराउंडर सिंकदर रजा याने झिंबाब्वेच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
सिंकदरने पहिले बॅटिंग करताना 6 फोर आणि 2 खणखणीत सिक्सच्या मदतीने 68 धावांची खेळी केली.
त्यानंतर सिंकदर रजा याने 8 ओव्हरमध्ये अवघ्या 36 धावा देत 2 निर्णायक क्षणी 2 विकेट्स घेतल्या. रजाने किमो पॉल आणि कॅप्टरन शाई होप या दोघांचा काट काढला.
सिंकदरने याशिवाय अल्झारी जोसेफ आणि ब्रँडन किंग या दोघांच्या कॅचही घेतल्या. रजाच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.