मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतेय.
आता सध्या स्पृहा ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करतेय.
या कार्यक्रमाच्या सेटवर स्पृहाचा सुंदर अंदाज पाहायला मिळतोय. आता तिनं मंडे ब्यूज म्हणत या निळ्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
आपल्या कविता आणि अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी (Actress Spruha Joshi). अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून स्पृहाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
मराठमोळी स्पृहा जोशी उत्तम अभिनेत्री आणि सुत्रसंचालक तर आहेच मात्र सोबतच ती उत्तम कवयित्रीसुद्धा आहे.