आज देशभरात होळीचा सण साजरा करण्यात आला. त्यात तुमच्या लाडक्या कलाकारांनीसुद्धा घरातच सेफ होळी साजरी केलीये. सर्वांच्या लाडक्या तैमुरनं मस्त रंगांमध्ये होळी खेळली आहे.
सोहा अली खाननंही होळीचा आनंद लुटला आहे. तिनं चिमुकलीसोबत होळी खेळताना एक फोटो शेअर केला आहे.
होळी सेलिब्रेशन आणि टूडल गँग कशी मागे राहणार. करण जोहर यांनी आपल्या चिमुकल्यांसोबत हा सण साजरा केला.
यावेळी करण जोहर यांची आईंनीसुद्धा होळीचा आनंद लुटला.
खिलाडी अक्षय कुमारनंसुद्धा धमाल करत धुळवड साजरी केली.