मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला पोहोचली आहे.
काही दिवसांपूर्वीच तिनं इन्स्टाग्रामवरुन 'Dateभेट' या चित्रपटाची घोषणा केली होती.
सोनाली नुकतीच 'Dateभेट'चं थोडं चित्रीकरण आटोपून काही कामानिमित्त भारतात आली होती. मात्र आता ती पुन्हा लंडनला परतली आहे.
या चित्रपटात सोनालीसोबत अभिनेता हेमंत ढोमेसुद्धा झळकणार आहे. हे दोघंही चित्रीकरणादरम्यान धमाल करत आहेत.
सोनाली सध्या लंडनमध्ये धमाल करत आहे. सोबतच ती चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटोसुद्धा पोस्ट करत आहे.