अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. आता तिनं हटके लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
अभिनेत्री पूजा सावंतनं 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकलं होतं.
तिनं आतापर्यंत मराठीमध्ये अनेक चित्रपट केले आहेत त्यामुळे आता तिचा चाहतावर्गसुद्धा मोठा आहे.
तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलेले दिसत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरपूर लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
पूजा सध्या 'महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर' या शोसाठी परीक्षकाची भूमिका साकारत आहे.